आरआरआर (RRR) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.



गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार 'आरआरआर' मधील नाटू नाटू या गाण्यानं पटकावला.



स्टीव्हन स्पीलबर्ग, जेम्स कॅमेरून आणि एडगर राइट यांसारख्या हॉलिवूडमधील दिग्गजांनी आरआरआर या चित्रपटाचं कौतुक केलं.



आता हा चित्रपट अमेरिकेतील 200 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय अमेरिकन डिस्ट्रीब्यूटर कंपनी वेरिएंस फिल्म्स (Variance Films) नं घेतला आहे.



वेरिएंस फिल्म्सनं आरआरआर या चित्रपटाचा ट्रेलर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.



'आरआरआर फायनल ट्रेलर, सेलिब्रेशनला सुरुवात करुयात. एस. एस. राजामौली यांचा मास्टरपीस असलेला आरआरआर हा 3 मार्च रोजी चित्रपट 200 पेक्षा जास्त चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.' असं कॅप्शन वेरिएंस फिल्म्सनं या ट्रेलरला दिलं.



आरआरआर या चित्रपटामधील नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्काराचं नामांकन मिळालं आहे.



आता आरआरआर हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार असल्यानं अमेरिकेतील नागरिकांना हा चित्रपट पाहता येणार आहे.



2022 मधील हिट आणि लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांच्या यादीत आरआरआर या पॅन इंडिया फिल्मच्या नावाचा समावेश होतो.



एसएस राजामौली यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.