अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये तिचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री श्रिया सरनच्या ट्रेडिशनल अंदाजाला चाहत्यांची पसंती मिळत आहे. श्रिया कोणताही लूक उत्तमरित्या कॅरी करते.
नवीन फोटोंमध्ये श्रिया मराठमोळ्या अंदाजामध्ये फारच सुंदर दिसत आहे. ग्रे कलरची कांजीवरम साडी आणि थ्री फोर्थ स्लीव्ह ब्लाऊज असा तिचा लूक आहे.
नाकात नथ आणि लो बन हेअर स्टाईलसोबत गुलाब अशी श्रियाची हेअर स्टाईल पार उठून दिसत आहे.
श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते. श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
अभिनेत्री श्रिया सरनचा 11 सप्टेंबर 1982 रोजी हरिद्वार येथे झाला. ती सध्या 40 वर्षांची आहे.
अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे.
2001 साली आलेल्या 'इश्तम' या तेलुगू चित्रपटातून श्रियाने अभिनयाला सुरुवात केली.
श्रिया सरन अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांच्या तुझे मेरी कसम चित्रपटात झळकली होती. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता.
'शिवाजी द बॉस' या 2007 साली आलेल्या अभिनेता रजनीकांत यांच्या चित्रपटात झळकल्यामुळे तिला खरी ओळख मिळाली.
नुकतीच श्रिया सरन 'दृश्यम 2' या चित्रपटात झळकली आहे. श्रिया, अजय देवगण आणि तबू अशी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाने मोठा गल्ला कमावला आहे.
बॉलिवूड चित्रपट 'दृश्यम'मध्ये श्रिया सरनने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली होती.