बिग बॉस फेम आणि अभिनेत्री शहनाज गील अलीकडे नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते. नुकतंच शहनाजने एका नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने पिवळा घागरा परिधान केला आहे. मोकळे केस आणि साजेशी ज्वेलरी घालून तिने हा लूक पूर्ण केलाय. काही दिवसांपूर्वीच शेहनाजने वजन कमी केलं होतं, त्यानंतर ती तिचे अनके फोटो सोशल मिडियाद्वारे शेअर करत असते. शेहनाजचं मनमोहक हास्य सगळ्यांचं मन जिंकून घेत आहे. तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झालेत. या लूक मध्ये शेहनाजचा कॉन्फिडन्स दिसून येतोय.