सध्या काजल तिच्या पतीसोबत म्हणजेच गौतम किचलूसोबत दुबईमध्ये आहे.
दुबईमध्ये एन्जोय करतानाचे फोटो काजलनं सोशल मीडियावर शेअर करत बॉडी शेमिंग करणाऱ्यांना सडोतोड उत्तर दिले आहे.
काजलनं पोस्टमध्ये लिहिले, 'माझ्या आयुष्यात सध्या वेगवेगळे बदल होत आहेत. ते शारीरीक, घरामधील आणि कामामध्ये होणारे बदल आहेत. अशा वेळी बॉडी शेमिंग आणि मीम्स तयार करणाऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही.'
पुढे तिने लिहिले, 'प्रेग्नन्सी दरम्यान आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत असतात. वजन देखील वाढते. '
काजलनं केलेल्या पोस्टवर समंथानं कमेंट केली, 'तू आताही सुंदर आहेस आणि नेहमीच सुंदर राहशील’
काजलनं प्रेग्नंट महिलांचे बदल समजून न घेणाऱ्या लोकांना मूर्ख म्हणलं आहे.