‘बिग बॉस 13’ मुळे शहनाज गिलला विशेष लोकप्रियता मिळाली. शहनाज गिल ही आपल्या अभिनयानं आणि क्युटनेसनं अनेकांची मनं जिंकते शाहनाजनं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीनं शहनाजचे हे फोटो काढले आहेत. शहनाजच्या या विंटर लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. व्हाईट स्वेटर, मोकळे केस अशा लूकमध्ये शहनाज दिसत आहे. ‘परी’, ‘क्यूट’, ‘खूबसूरत’, ‘विंटर वाइब’ अशा प्रकारच्या कमेंट्स शहनाजच्या या फोटोला नेटकऱ्यांनी केल्या आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामधून लवकरच शहनाज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शहनाजच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. शहनाजचा चाहता वर्ग मोठा आहे.