छोट्या पडद्यावरील 'कशिश' म्हणजे अभिनेत्री आमना शरीफने फंकी आणि कुल असे नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
टी-शर्ट, ओव्हर शर्ट आणि जीन्स अशा कॅज्युअल लूकमध्ये अभिनेत्री आमना शरीफचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अवतार समोर आला आहे.
छोट्या पडद्यावरील मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आमना शरीफचं नाव घराघरात नाव पोहोचलं.
आमना शरीफने छोट्या पडद्यापासून अभिनयाला सुरुवात केली. आमना शरीफने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे.
आमनाने अभिनयाची सुरुवात 2003 साली आलेल्या कही तो होगा या मालिकेतून केली.
'कहीं तो होगा'मधील 'कशिश'च्या भूमिकेमुळे आमनाला वेगळी ओळख मिळाली. आमनाने चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.
आमना 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे. आमनाने सौंदर्य आणि अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे.
2009 साली आलेल्या 'आलूचाट' चित्रपटातून आमनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आमना या चित्रपटात अभिनेता आफताब शिवदसानीसोबत झळकली होती.
2014 साली आलेल्या 'एक विलन' चित्रपटात आमना रितेश देशमुखच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे.