बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. पठाणमध्ये शाहरुखसोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. बार अँड बेन्चच्या रिपोर्टनुसार, पठाण हा चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 25 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे ओटीटीवर रिलीज होण्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने यशराज फिल्म्स बॅनरच्या 'पठाण' मध्ये काही बदल करण्यास सांगितले आहे. उच्च न्यायालयाने पठाण चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यापूर्वी चित्रपट निर्मात्यांना सीबीएफसीककडून (CBFC) पुन्हा प्रमाणपत्र घेण्यास सांगितले आहे.' न्यायालयाने चित्रपट निर्मात्यांना ओटीटी रिलीजसंदर्भात 20 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पठाण व्यतिरिक्त शाहरुख हा राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' या आगामी चित्रपटामध्येही प्रमुख भूमिका साकारणार आहे. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत पठाण हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.