‘बिग बॉस 13’मुळे शहनाझ गिल प्रचंड चर्चेत आली होती. या शोमधून तिला प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग मिळाली होती. अभिनेत्री सोशल मीडियावरही अभिनेत्री प्रचंड लोकप्रिय आहे. नुकतंच तिने एका मुलाखतीत ‘बिग बॉस 13’नंतर आपलं आयुष्य कसं बदललं, यावर भाष्य केलं आहे. आपल्या संघर्षाबद्दल सांगताना शहनाज म्हणते, ‘मी माझ्या आयुष्यात सगळं काही खूप मेहनतीने कमावलं आहे. आयुष्यात वेळे आधी आणि सहज कोणतीच गोष्ट मिळत नाही. एखादी गोष्ट जर लवकर मिळाली, तर ती लवकर नाहीशी देखील होते. मी आतापर्यंत खूप मेहनतीने काम केलं. यापुढेही असंच मेहनतीने काम करेन. बिग बॉसनंतर माणूस म्हणून मी आजही तशीच आहे. फक्त माझं व्यवहार ज्ञान आता बरंचस वाढलं आहे. गोष्टी कशा करव्यात हे मी आता शिकून घेतलं आहे. मी तेव्हाही बेस्ट होते आणि आताही बेस्टच आहे.’