साऊथच्या अभिनेत्री त्यांच्या अभिनयाप्रमाणेच त्यांच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहेत अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ही सौंदर्यवान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते अनुपमाचा साधा लूकही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो नुकतेच अनुपमाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील सिंपल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे अनुपमाच्या या सिंपल लूकवर चाहत्याच्या नजरा खिळल्या आहेत तिचे कुरळे केस तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहेत अनुपमाने 'प्रेमम' या चित्रपटातून चित्रपटांमध्ये पदार्पण केलं अनुपमाच्या सुंदर हास्यावर देशभरातील लाखो चाहते फिदा आहेत अनुपमाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे