अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच आई बनली असून तिने सोशल मीडियाव ही माहिती दिली होती. प्रियांकाच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून प्रियांकाने तिच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये पती निक जोनासही तिच्यासोबत आहे मदर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने तिच्या लेकीचा फोटो शेअर केला प्रियांका आणि निक यांचा विवाह 1 डिसेंबर 2018 रोजी झाला होता. प्रियांका आणि निकच्या मुलीचं नाव 'मालती मेरी चोप्रा जोनास' आहे. प्रियांका हिंदू आणि निक ख्रिश्चन असून या मुलीच्या नावात हे दोन्ही झळकतं