शर्मिष्ठाने पूर्ण केलं सोळा सोमवारचं व्रत, पहा उद्यापनाचे फोटो!



'बिग बॉस मराठी' या लोकप्रिय कार्यक्रमातून चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत.



‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून शर्मिष्ठा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.



अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने अलिकडेच तेजस देसाईसोबत लग्नगाठ बांधली आहे.



नुकतेच शर्मिष्ठाने तिचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



शर्मिष्ठाने सोळा सोमवारचं व्रत पूर्ण केले असून त्याच्या उद्यापनाचे हे फोटो आहेत.



यात शर्मिष्ठा आणि तेजस पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेले दिसत आहेत.



शर्मिष्ठाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.