सईची कुटुंबासोबत लॉन्ग ट्रिप, पाहा फोटो मराठी बिग बॉस या शोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. अनेकदा ती आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर फोटो शेअर करत असते. सईच्या फोटोंमधून तिचं कुटुंब नेहमी झळकत असतं नुकतीच सई तिच्या कुटुंबासोबत फिरायला गेली होती या ट्रिपचे अनेक फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोंमध्ये सई भरपूर मस्ती करताना आणि मजा घेताना दिसत आहे. सईचे हे फोटो गंगटोक आणि सिक्कीममधले आहेत.