आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांतील व्यवहार पाहता आज बाजारात तेजीसह सुरुवात झाली आहे. मागील चार दिवसाच्या घसरणीनंतर बाजाराची चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्ससह निफ्टीची घोडदौड सुरु झाली आहे. आज बाजार सुरु होताच बीएसई सेन्सेक्स 253 अंकानी उसळी घेऊन 59,859 वर उघडला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 80 अंकांनी वाढून 17,500 वर उघडला. आज पीएसयू बँक, आयटी, मेटल आणि इतर काही सेक्टर्सचे शेअर्स तेजीत आहेत. मीडिया शेअर्समध्ये मात्र थोडीशी घसरण झाली. गेल्या अनेक ट्रेडिंग सत्रांमध्ये बाजार तेजीसह उघडला होता, मात्र बुकिंग आणि विक्रीमुळे बाजार बंद होण्याच्या वेळी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.