आज, बुधवारी भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला. सेन्सेक्स निर्देशांक 928 अंकांनी घसरून 59 हजार 745 अंकांवर स्थिरावला. निफ्टी 272 अंकांच्या घसरणीसह 17 हजार 554 अंकांवर बंद झाला. बँकिंग, आयटी, ऑटो, मेटल्स, फार्मा, एनर्जी आदी सगळ्याच सेक्टरमध्ये घसरण बँक निफ्टी 1.73 टक्क्यांच्या घसरणीसह 39,974 अंकांवर स्थिरावला. अदानी एन्टरप्रायझेज, अदानी पोर्ट, बजाज फायनान्ससारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण डॉलरच्या तुलनेत आज रुपया कमकुवत झाला. आज रुपया 82.85 वर स्थिरावला ITC, बजाज ऑटो, Divis Lab चे शेअर्स वधारले. आज दिवसभरातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या चार लाख कोटींचा चुराडा झाला. सूचीबद्ध कंपन्यांपैकी 953 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी, तर 2520 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण