सोन्या-चांदीचे दर नेहमीच कमी-जास्त होत असतात. सकाळी पाहिलेले दर संध्याकाळपर्यंत सारखेच असतील याची खात्री देणं तसं कठीणच आहे.
त्यामुळे तुम्ही आता जर सोन्याचे दर पाहात असाल तर आज सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे.
बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 55,930 रूपयांवर आला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 51,269 वर आला आहे,
आज एक किलो चांदीचा दर 65,400 रूपयांवर आला आहे. कालच्या तुलनेत आज 200 रूपयांनी घट झाली आहे.
जागतिक बाजारात सोनं, चांदी सोडल्यास इतर मौल्यवान धातूंच्या जसे की, तांबे, जस्त आणि शिशाच्या किंमतीही किंचित कमी झाल्या आहेत.
नवीन वर्षात सोन्याच्या किंमती म्हणाव्या तेवढ्या कमी आल्या नाहीत. पण, सोन्याचे दर स्थिर असेपर्यंत तुम्ही खरेदी करू शकता.
तसेच, लग्नासाठी किंवा गुंतवणूक म्हणून देखील सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला ठरू शकतो.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.