आज मुंबई, पुणे, नाशिक, कोलकाता आणि राजधानी दिल्लीसह सोन्याच्या किंमतीत फारसा बदल झालेला नाही
24 कॅरेट सोन्याचा दर 56,180 रूपयांवर आला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 51,498 वर आला आहे.
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरांत आज मात्र किरकोळ वाढ झाली आहे.
बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, आज एक किलो चांदीचा दर 66,030 रूपयांवर आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे दर काहीसे स्थिर आहेत. त्यामुळे लग्नसराईत ग्राहकांना सोनं करण्याची ही चांगली संधी ठरू शकते.
स्पॉट गोल्ड 0.1% वाढ होऊन 1,835.40 डॉलर प्रति औंस झाले. यूएस गोल्ड फ्युचर्स 0.1% वाढ होऊन 1,845.10 डॉलरवर आले.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.