आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात चांगली सुरुवात पाहायला मिळाली. सुरुवातीच्या सत्रात बँक निफ्टीची चांगली घोडदौड पाहायला मिळाली. आशियाई शेअर बाजारांमध्ये वाढीचे चांगले संकेत दिल्यानंतर भारतीय बाजार तेजीने उघडला. BSE सेन्सेक्स 420 अंकांच्या उसळीसह 60350 वर उघडला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 111 अंकांच्या उसळीसह 17,721 अंकांवर उघडला. आज शेअर बाजारात, बँकिंग, ऑटो, पीएसयू बँक, एफएमसीजी, कंझ्युमर ड्युरेबल्स यांसारख्या क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली आहे. आयटी, फार्मा, धातू, ऊर्जा, तेल आणि वायू आणि हेल्थकेअरचे शेअर्स घसरले खाली आहेत. दरम्यान, शेअर बाजारात चढउतार कायम आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागही घसरणीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 21 शेअर्स वाढीसह आणि 9 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 26 शेअर्स वाढीसह आणि 24 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आजही घसरण पाहायला मिळत आहे. अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर्स 5 ते 20 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.