अर्थसंकल्पानंतर देशात तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केलेत.

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती वाढल्यात.

देशात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

अर्थसंकल्पानंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.

राज्यातही गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

परभणीत 109.45 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 95.81 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.

नाशकात पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.

औरंगाबादमध्ये पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर आहे.

कोल्हापुरात पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.