शेअर बाजारात आज सुरुवातीपासून मोठी अस्थिरता होती बाजार बंद होताना शेअर बाजार मात्र सावरला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 224 अंकांनी वधारला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ 4 अंकांनी घसरला सेन्सेक्समध्ये आज 0.38 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,932 अंकांवर पोहचला निफ्टीमध्ये आज 0.02 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,612 अंकांवर पोहोचला निफ्टी बँकमध्ये आज 222 अंकांची वाढ होऊन तो 40,735 अंकांवर पोहोचला आज बाजार बंद होताना एकूण 1637 शेअर्समध्ये वाढ झाली तर 1759 शेअर्समध्ये घसरण झाली. एकूण 122 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.