कालच (बुधवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सोन्या-चांदीचे दर आणखी महाग होणार असे त्यांनी सांगितले.
इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यामुळे तसेच, आर्थिक मंदीची भीती आणि डॉलरच्या संख्येत झालेली वाढ हे देखील दरवाढीचं कारण आहे.
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 58,500 रूपयांवर आला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 53,625 रूपयांवर आला आहे.
आज एक किलो चांदीचा दर 71,520 रूपयांवर आला आहे. सोन्याच्या दरात तब्बल 2,700 रूपयांची वाढ झाली आहे.
सोन्याचे हे वाढलेले दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि राजधानी दिल्लीसह इतर ठिकाणीही कमी-जास्त प्रमाणात व्यवहार करतात.
सुवर्णनगरी जळगावमध्येही सोन्याचे दर तब्बल 59 हजारांच्या घरात पोहोचले आहेत.
सोन्या-चांदीच्या दरात झालेली वाढ ग्राहकांना परवडत नसल्याने अनेक ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सोन्याची किंमत तपासू शकता.
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकतात.