शेअर बाजारात तेजीसह सुरुवात झाली मात्र, लगेच सेन्सेक्समध्ये 170 अंकांची घसरण पाहायला मिळाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडला. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातही आज तेजीत आहे. BSE सेन्सेक्स 86 अंकांच्या वाढीसह 60,044 अंकांवर तर NSE निफ्टी 9 अंकांच्या वाढीसह 17,867 वर उघडला. मात्र थोड्याच वेळात बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 106 तर निफ्टी 23 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण होताना दिसत आहे. या उलट मेटल, रिअल इस्टेट आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्स वधारत आहेत. मिडकॅपमध्ये घसरण होत आहे, तिथे स्मॉलकॅप निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढीसह आणि 17 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 28 शेअर्स वाढीसह तर 22 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. बँकिंग स्टॉक विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सवर आज बाजार अवलंबून असल्याचे दिसत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.