नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मौल्यवान धातूंच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि जागतिक डॉलरच्या संख्येत घट यामुळे हा परिणाम दिसून येतोय. भारतात लग्नसराई बरोबरच आता विविध सणांनाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्राहक सोन्याची खरेदी करतात. तसेच, आर्थिक गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे ग्राहकांची बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी कमी पाहायला मिळते. आज बुलियन्सच्या रिपोर्टनुसार पाहिल्यास, एक किलो चांदीचा दर 68,370 रूपयांवर व्यवहार करत आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 56 हजारांच्याही पुढे गेला आहे. तर, 22, कॅरेट सोन्याचा दर 51,379 वर गेला आहे. स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.