नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात पहिलाच येणारा सण म्हणजेच मकरसंक्रांत. या निमित्ताने महिला वर्ग मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी करतात.

तसेच, नवीन वर्षाला आर्थिक गुंतवणूक म्हणून अनेकजण सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात.

मात्र, जागतिक डॉलरच्या घसरणीमुळे मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. या वाढीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा दर तब्बल 56 हजारांच्या घरात पोहोचला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 51,306 रूपयांवर व्यवहार करत आहे.

चांदीच्या दरात देखील चांगलीच किंमत आलेली आहे. आज एक किलो चांदीचा दर 68,560 रूपयांवर व्यवहार करत आहे.

सोन्या-चांदीची वाढलेली किंमत मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राजधानी दिल्लीतही सारख्याच प्रमाणात व्यवहार करतात.

स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.

स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते.

इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.