आज 12 जानेवारी रोजी, सेन्सेक्स 147 अंकांनी घसरुन 59,958 अंकांवर स्थिरावला निफ्टी 37 अंकांच्या घसरणीसह 17,858 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात आज आयटी, ऑटो, मीडिया सेक्टरमधील स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. बँकिंग, एनर्जी, एफएमसीजी, ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थ केअर, ऑईल अॅण्ड गॅस, मेटल्स सेक्टरमध्ये घसरण झाली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर दरातही घसरण दिसून आली. रिलायन्स अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, कोटक महिंद्राच्या शेअर दरात घसरण दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया आज स्थिर राहिला. रुपया 81.55 वर स्थिरावला. अल्ट्राटेक सिमेंट, एल अॅण्ड टी, एचसीएल टेक, मारुती सुझुकी, नेस्लेच्या शेअर दरात तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 279.93 लाख कोटी रुपये झाले. सूचीबद्ध असलेल्या 3652 कंपन्यांपैकी 1613 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली