आज शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीच्या उसळीसह चांगली सुरुवात झाली आहे.
आज सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्सनं 300 अंकांनी उसळी घेतली तर, निफ्टीही तेजीत 17500 वर व्यवहार करताना पाहायला मिळाला.
आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात चांगली सुरुवात झाली.
आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 145.06 अंकांनी म्हणजेच 0.25 टक्क्यांनी वाढून 59,280.19 वर उघडला.
तसेच, निफ्टी 42.80 अंकांनी म्हणजे 0.25 टक्क्यांनी वाढून 17,455.70 वर होता.
अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली बँकेच्या संकटामुळे अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीचा फटका भारतीय शेअर बाजारावर होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र, अमेरिकन बाजारातील घसरणीचा सध्या भारतीय शेअर बाजारावर फारसा परिणाम झालेला दिसत नाहीय. जागतिक बाजारातील चढउताराचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.
सुरुवातीच्या सत्रात तेजीत व्यवहार करणाऱ्या शेअर्समध्ये टेक महिंद्रा, अदानी एंटरप्रायझेज, अदानी पोर्ट, हिंदाल्को इंडस्ट्रीज आणि अपोलो हॉस्पिटल हे शेअर्स आहेत.
दुसरीकडे, इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, टायटन, एसबीआय लाईफ इन्शॉरन्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
आज प्री-ओपनमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये घसरणीसह व्यवहार करत होते.
BSE चा सेन्सेक्स 190.61 अंकांच्या म्हणजेच 0.32 टक्क्यांच्या घसरणीसह 58944.52 वर होता.
NSE चा निफ्टी 19.85 अंकांनी म्हणजेच 0.11 टक्क्यांनी घसरून 17393.05 वर व्यवहार करत होता.