देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केलेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर तेल कंपन्या हे दर ठरवतात. आज WTI क्रूड ऑइलच्या किमतीत .28 टक्के घसरण नोंदवली गेली असून प्रति बॅरल 75.42 डॉलरवर आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत 1.10 टक्क्यांनी घसरण झाली असून प्रति बॅरल 81.56 डॉलरवर आहे. देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे, जिथे किंमत 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राष्ट्रीय स्तरावर मे 2022 पासून आतापर्यंत जैसे थे आहेत. आज मुंबईत पेट्रोल 106.31 रुपयांनी, तर डिझेल 94.27 रुपयांनी विकलं जातंय. पुण्यात पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.36 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय. नाशकात पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.