आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली आहे.
बाजारातील सलग तीन दिवसांच्या तेजीवर गुरुवारी ब्रेक लागला.
त्यानंतर आज बाजाराची घसरणीसह सुरुवात झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये निराशा पाहायला मिळत आहे.
आज सुरुवातीच्या सत्रा शेअर बाजार गडगडला. बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली.
जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळत आहे.
आज सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरणीसह सुरुवात झाली.
सुरुवातीलाच सेन्सेक्स 59,000 हजारांच्या खाली घसरला तर, निफ्टीही घसरून 17500 व्यवहार करताना पाहायला मिळाला.
सध्या सेन्सेक्सची घसरण सुरुच असून त्यामध्ये 800 अंकांनी घसरण झाली आहे.
तसेच निफ्टीमध्ये 1.1 टक्के घसरण झाली असून निफ्टी 17400 वर व्यवहार करत आहे.
टाटा मोटर्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, बजाज ऑटो आणि महिंद्रा अँड महिंद्रा या शेअर्सची तेजीत घोडदौड पाहायला मिळत आहे.
अदानी एंटरप्रायझेस, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.