आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्ससह निफ्टीची घोडदौड पाहायला मिळाली. सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात तेजीत व्यवहार सुरु झाले मात्र हे चित्र फार काळ टिकू शकलं नाही.
या आठवड्यात मंगळवारी होळीच्या सुटीमुळे बाजार बंद होता मात्र त्यानंतरही बाजारात तेजी कायम असल्याचं दिसून आलं.
आज गुरुवारी बाजार तेजीत सुरु झाला मात्र, त्यानंतर विक्रीचा दबाव पाहायला मिळाल्यानं बाजार घसरला.
आज सकाळी भारतीय शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 119 अंकांच्या वाढीसह 60,467 वर उघडला. निफ्टीही 18 अंकांच्या वाढीसह 17,772 वर उघडला.
शेअर बाजाराचा सुरुवातीचा टप्पा पाहता आजही तेजीच सत्र कायम राहील असं वाटत होतं
मात्र, लवकरच जागतिक बाजाराचा दबाव गुंतवणूकदारांवर दिसू लागला आणि त्यांनी नफ्यासाठी विक्री करण्यास सुरुवात केली.
विक्रीमुळे सकाळी 9.40 वाजता सेन्सेक्स 131 अंकांनी घसरून 60,217 वर पोहोचला. तर, निफ्टी 35 अंकांच्या घसरणीसह 17,720 वर पोहोचला.
आज जागतिक बाजारातील घसरणीचा दबाव देशांतर्गत गुंतवणूकदारांवरही दिसून येत आहे.
हिंदाल्को इंडस्ट्रीज, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल हे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.