आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार कायम आहे.



भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केलेली नाही.



मागील काही दिवस आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार सुरुच आहे.



देशातील प्रमुख तेल कंपन्या दररोज नवीन इंधन दर जारी करतात. भारतीय तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.



आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. मात्र, देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.



देशाची राजधानी नवी दिल्लीत पेट्रोलचे दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 89.62 रुपये प्रति लिटर आहेत.



मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आणि डिझेलची किंमत 94.27 रुपये आहे.



कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.



उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पेट्रोल 96.76 रुपयांनी विकलं जात असून त्यात 11 पैशांनी वाढ झाली आहे तर, डिझेलचा दर 89.93 आहे आणि त्यातही 11 पैशांनी वाढ झाली आहे.



गाझियाबादमध्ये पेट्रोल 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे.



गुरुग्राममध्ये डिझेल 16 पैसे स्वस्त झालं असून 89.72 रुपये प्रति लीटर आहे. तर, पेट्रोल 96.84 रुपये प्रति लिटर म्हणजे 17 पैसे स्वस्त झालं आहे.