आज शेअर बाजारात चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे. सेन्सेक्ससह निफ्टीची घोडदौड सुरु आहे.
आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत व्यवहार करताना दिसत आहेत. बाजार उघडताच सेन्सेक्स 100 अंकांनी वाढून 60000 पार पोहोचला.
निफ्टीचाही तेजीत व्यवहार सुरु असून निफ्टी 17850 च्या वर पोहोचला आहे. आज शेअर बाजारामध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
आज शेअर बाजाराच्या सुरुवातीला बीएसई (BSE) सेन्सेक्स 118.41 अंकांनी म्हणजे 0.20 टक्क्यांच्या वाढीनंतर 60,550 वर उघडला.
याशिवाय, एनएसई (NSE) चा निफ्टी 69.45 अंकांनी म्हणजेच 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 17,840 वर व्यवहार करत आहे.
आज बँक निफ्टीमध्ये चांगली तेजी पाहायला मिळत आहे. बँक निफ्टी 0.24 टक्क्यांच्या वाढीनंतर 41300 वर पोहोचला आहे.
एम अँड एम (M&M), रिलायंस, TCS, विप्रो (Wipro), हिंदुस्थान युनिलिव्हर (Hindustan Unilever), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), एचडीएफसी बँक (HDFC Bank) हे शेअर्स तेजीत आहेत.
त्यासोबतच एअरटेल (Bharti Airtel), ITC, मारुती (Maruti), अल्ट्राटेक सिमेंट (UltraTech Cement), बजाज फायनांस (Bajaj Finance), टाटा स्टील (TATA Steel) हे शेअर्सही तेजीत आहेत.
ॲक्सिस बँक, सनफार्मा, पावरग्रीड, बजाज फिनसर्व्ह आणि इंडसइंड, एशियन पेंट्स हे शेअर्स गडगडले आहेत.