सध्या जागतिक बाजारात डॉलरच्या मूल्यात घट झाल्यामुळे भारतीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,760 रूपयांवर आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 52,030 रूपयांवर आहे. मागच्या एक आठवड्यापासून सोन्याचे दर घसरल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदीसाठी आजचाही दिवस चांगला आहे. आज एक किलो चांदीचा दर 66,890 रूपयांवर आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात 500 रूपयांची घट झाली आहे. सोन्याचे हे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राजधानी दिल्लीतही थोड्याफार प्रमाणात सारखेच आहेत. आज आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पॉट गोल्डची किंमत $ 2.06 कमी होऊन $ 1,872.36 प्रति औंसवर आली आहे. स्पॉट सिल्व्हर प्रति औंस $ 0.09% कमी होऊन चांदीच्या किमती $ 22.19 प्रति औंसवर आहेत. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.