आज शेअर बाजारात ओपनिंगला काही प्रमाणात पडझड झाल्याचं पाहायला मिळालं.

शुक्रवारी झालेल्या घसरणीपेक्षाही गॅप डाऊन ओपनिंग झाली आहे.

आज बँक निफ्टी देखील 229 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत असून तो 40,000 च्या खाली पोहोचला आहे.

दरम्यान, बाजार उघडल्यानंतर 5 मिनिटांत सेन्सेक्समधील घसरण कव्हर झाल्याचं पाहायला मिळालं आणि सेन्सेक्समध्ये रिकव्हरी दिसून आली.

आज बाजार उघडल्यानंतर 15 मिनिटांतच सेन्सेक्स आणि निफ्टीनं वेग पकडल्याचं पाहायला मिळालं.

बाजार उघडल्यानंतर काहीसा घसरलेला सेन्सेक्स नंतर सावरल्याचं दिसून आलं.

सेन्सेक्स 266.82 अंकांच्या म्हणजेच, 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 59,597.72 वर पोहोचला आहे.

दुसरीकडे, NSE चा निफ्टी 85.50 अंकांच्या म्हणजेच, 0.49 टक्क्यांच्या वाढीसह 17,689.85 वर व्यवहार करत आहे.

आज बाजाराच्या सुरुवातीला बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 229.21 अंकांनी म्हणजेच 0.39 टक्क्यांनी घसरून 59,101.69 वर उघडला.

NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 62.40 अंकांनी किंवा 0.35 टक्क्यांनी घसरून 17,541.95 वर उघडला.