भारतीय तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केलेत.

आज देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही.

देशातील काही शहरांमध्ये इंधन दरांत किंचतशी वाढ, तर काही शहरांमध्ये किंचितशी घट नोंदवण्यात आलीये.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सर्वोच्च पातळीवर पोहोचल्यात.

त्याचा प्रभाव देशांतर्गत बाजारातील इंधन दरांवर होताना दिसत नाहीये.

डिझेलच्या विक्रीवर तेल कंपन्यांना प्रतिलिटर 13 रुपयांचा तोटा होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

आज देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.

देशाच्या राजधानीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.