आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमती सतत वर-खाली होत असतात.
जागतिक बाजारात डॉलरमध्ये झालेली वाढ आणि आर्थिक मंदीची भीती यामुळे सोन्या-चांदीचे दर सातत्याने वाढतायत.
अनेकजण गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याचं नाणं खरेदी करतात. मात्र, वाढलेल्या दरामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागतोय.
भारतात पौष महिना सरताच लग्नसराईचे दिवस सुरु होतात. मात्र, सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करताना मुरड घालावी लागतेय.
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,070 रूपयांवर गेला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 52,314 वर गेला आहे.
आज एक किलो चांदीचा दर 68,410 वर गेला आहे. कालच्या तुलनेत आज 400 रूपयांनी घट झाली आहे.
सोन्या-चांदीचे वाढलेले दर हे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि राजधानी दिल्लीसह इतर ठिकाणीही कमी-जास्त होत असतात.
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.
इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.