आज शेअर बाजारात संमिश्र सुरुवात पाहायला मिळाली आहे. जागतिक शेअर बाजाराचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसत आहे.

आज शेअर बाजारात संमिश्र सुरुवात पाहायला मिळाली आहे. जागतिक शेअर बाजाराचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसत आहे.

अमेरिकन बाजारातील पडझडीमुळे भारतीय बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे.



आज शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्सची किंचित घसरण झालू असून निफ्टी किचिंत वाढीसह व्यवहार करत असल्याचं चित्र आहे.



सोमवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला होता. जागतिक बँकिंग संकटाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसत आहे.



आज बाजार सुरु होताच बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 69.10 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 58,168.75 वर उघडला.



एनएसईचा निफ्टी निर्देशआंक 6.25 अंकांनी वाढून 17,160.55 वर उघडला. आज सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये घसरण झाली असून निफ्टी तेजीत आहे.



सेन्सेक्समधील 30 पैकी 9 शेअर्स तेजीत आहेत आणि 21 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.



याशिवाय निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी फक्त 19 शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे आणि 30 शेअर्समध्ये घसरणीची लालसर आहे. एक स्टॉक सामान्य स्थितीत कायम आहे.



अपोलो हॉस्पिटल, अदानी पोर्ट, अदानी इंटरप्रायजेस, एशियन पेंट्स, भारती एअरटेल हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.



बजाज फायनान्स, सिपला, ब्रिटॅनिया, कोल इंडिया, एचडीएफसी बँक या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.