आज (13 मार्च 2023) तेजीसह सुरुवात झालेल्या भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली.



सेन्सेक्स 897.28 अंकांच्या घसरणीसह 58,237.85 अंकांवर स्थिरावला.



निफ्टी 258.60 अंकांच्या घसरणीसह 17,154.30 अंकांवर बंद झाला.



बीएसई मिडकॅपमध्ये 1.8 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 2 टक्क्यांची घसरण झाली.



सेन्सेक्समधील 30 पैकी 29 कंपन्यांचे, तर निफ्टी 50 पैकी 45 कंपन्यांचे शेअर दर घसरले.



इंडसइंड बँक, एसबीआय, टाटा पॉवर,, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि आयशर मोटर्स या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण.



डॉलरच्या तुलनेत आज रुपयात 8 पैशांची घसरण झाली. रुपया आज 82.12 वर स्थिरावला.



टेक महिंद्रा आणि अपोलो हॉस्पिटल आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी.



शेअर बाजारात झालेल्या घसरणीच्या परिणामी गुंतवणूकादारांना मोठा फटका बसला आहे.



आज झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 3.90 लाख कोटी बुडाले.