आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,020 रूपयांवर व्यवहार करत आहे. चीनमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने भारतातही दहशत निर्माण केली आहे. सोन्याचे दर 8 महिन्यांसाठी वाढले आहेत. त्यामुळे डॉलरच्या संख्येत वाढ झाली आहे. याचा परिणाम देखील दरवाढीवर दिसून येतोय. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, आज 22 कॅरेच सोन्याचा दर 51,352 रूपयांवर व्यवहार करत आहे. आज चांदीच्या दरात मात्र, घसरण पाहायला मिळतेय. एक किलो चांदीचा दर आज 68,630 रूपयांवर व्यवहार करत आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याचे दरही वाढल्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. मौल्यवान धातूंच्या किंमतीचे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राजधानी दिल्ली आणि इतर अन्य ठिकाणीही काही अंशी सारख्याच दरात व्यवहार करतात. सोन्याकडे अनेकजण आर्थिक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून देखील पाहतात. मात्र, सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे गुंतवणुकीचा पर्य़ाय देखील सध्या मागे राहिला आहे. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.