शेअर बाजारात आज (10th January 2023) विक्रीचा सपाटा दिसून आला.

सोमवारी दिवाळी साजरी केलेल्या गुंतवणूकदारांचे आज दिवाळं निघालं.

सेन्सेक्स 631.83 अंकांनी घसरून 60,115.48 अंकांवर स्थिरावला.

निफ्टी 187.05 अंकांच्या घसरणीसह 17,914.15 अंकांवर स्थिरावला.

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 8 कंपन्यांचे शेअर दर वधारले होते.

अदानी एंटरप्रायझेस, भारती एअरटेल, आयशर मोटर्स, अदानी पोर्टस, एसबीआयच्या शेअर दरात घसरण दिसली.

डॉलरच्या तुलनेत आज रुपया 58 पैशांनी मजबूत झाला. रुपया आज 81.78 वर बंद झाला.

टाटा मोटर्स,अपोलो हॉस्पिटल, हिंदाल्को, पॉवरग्रीड, डिव्हिज लॅबच्या शेअर दरात तेजी दिसली.

निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 17 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.

1376 कंपन्यांचे शेअर वधारले होते. तर, 2027 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली.