कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) वरील व्याजात वाढ होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 8.15 टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी EPFO कडून 8.10 टक्के दराने व्याज दिले जात होते. यंदाच्या पीएफच्या व्याज दरात कपात केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 8.15 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. 2021-22 साठी व्याजदर 8.1 टक्के इतका होता. हा व्याजदर गेल्या 40 वर्षांतील सर्वात कमी होता. EPFO चे जवळपास 6 कोटी खातेदार आहेत. या कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे 27.73 लाख कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन EPFO च्या माध्यमातून केले जाते. EPFO अनेक ठिकाणी पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा केलेली रक्कम गुंतवते.