आज देशांतर्गत शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्ससह निफ्टीची घोडदौड सुरु आहे.
आज सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्सची सुरुवात तेजीत 57750 च्या पुढे झाली आहे.
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांच्या वाढीसह व्यवहार करत असल्याचे दिसते.
त्याचवेळी निफ्टीनेही जोरदार व्यवहार करताना 17000 चा आकडा ओलांडला आहे.
देशांतर्गत शेअर बाजाराने आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी जोरदार सुरुवात केली आहे.
सुरुवातीच्या सत्रात मेटल, रियल्टी आणि फायनॅन्स संबंधित क्षेत्रातील शेअर्स तेजीत दिसत आहेत.
आज, मंगळवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 22 पैशांच्या वाढीसह उघडला. रुपयाने 82.37 च्या तुलनेत 81.15 प्रति डॉलरवर उघडला.
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्स मंगळवारी सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात तेजीत व्यवहार करताना दिसत आहेत.
फार्मा, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्ससह तेल आणि गॅस सेक्टरच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे. या व्यतिरिक्त इतर सर्व सेक्टर तेजीत व्यवहार करत आहेत.
रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक 0.40 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे आणि त्यानंतर फायनॅन्स सेक्टरमध्ये 0.30 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.
इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयटीसी, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, एचयूएल, टायटन, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह, एल अँड टी आणि एनटीपीसी या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
सध्या बाजारात मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रीड, एचसीएल टेक, कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, सन फार्मा, बजाज फायनान्स, नेस्ले, ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स आणि भारती एअरटेल या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.