आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारत बंद झाला. सेन्सेक्स 1031 अंकांच्या तेजीसह 58,991 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 26 कंपन्यांचे शेअर वधारले. निफ्टीतील 50 पैकी 43 कंपन्यांचे शेअर वधारले. निफ्टी 279 अंकांच्या तेजीसह 17,359 अंकांवर स्थिरावला. सनफार्मा, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, टायटन या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण डॉलरच्या तुलनेत आज रुपया 15 पैशांनी मजबूत होऊन 82.18 वर स्थिरावला. रिलायन्स, नेस्ले, इन्फोसिस, ICICI Bank, टाटा मोटर्स, TCS, विप्रोच्या शेअरमध्ये तेजी बँकिंग क्षेत्रात 1.75 टक्के, आयटी सेक्टरमध्ये 2.45 टक्क्यांनी वाढ झाली. मार्केट कॅप 258.19 लाख कोटी झाले असून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.42 लाख कोटी रुपयांची वाढ झाली