भारतीय शेअर बाजारात आज (3 मार्च) खरेदीचा जोर दिसल्याने सेन्सेक्स, निफ्टी वधारला सेन्सेक्स 882 अंकांच्या तेजीसह 59,797 अंकांवर स्थिरावला. निफ्टी 266 अंकांच्या तेजीसह 17,589 अंकांवर बंद झाला. आज दिवसभरातील व्यवहारात सगळ्याच सेक्टरमधील शेअर्स तेजीसह बंद झाले. FMCG, एनर्जी, मेटल्स, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑईल अॅण्ड गॅस, हेल्थकेअर सेक्टरमध्ये तेजी अल्ट्राटेक सिमेंट, सिप्लाच्या शेअर दरात घसरण दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया 63 पैशांनी मजबूत झाला. आज रुपया 81.96 वर स्थिरावला. निफ्टीतील 50 पैकी 40 शेअर्समध्ये, तर सेन्सेक्समधील 30 पैकी 26 कंपन्यांचे शेअर्स वधारले अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एसबीआय, भारती एअरटेल, रिलायन्सच्या शेअरमध्ये तेजी शेअर बाजारातील कंपन्यांचे मार्केट कॅप 263.34 लाख कोटी रुपये झाले. गुरुवारच्या तुलनेत 3.36 लाख कोटी रुपयांची वाढ झाली