आज मार्च महिन्यातला दुसरा दिवस म्हणजेच गुरुवार. पण, मार्च महिन्याची सुरुवात सर्वसामान्य ग्राहकांसाठी काही खास दिसत नाही.
याचं कारण म्हणजे, महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागतोय.
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 55 हजार 860 रुपयांवर आला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 205 रुपयांवर आला आहे.
सोन्याच्या दरात जवळपास 422 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना आज सोनं खरेदी करणं महाग पडू शकतं.
आज एक किलो चांदीचा दर 64 हजार 270 रुपयांवर आला आहे. चांदीच्या दरात तब्बल 530 रुपयांची वाढ झाली आहे.
ऐन लग्नसराईत कमी आलेले सोन्याचे दर पुन्हा वाढल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करताना मुरड घालावी लागतेय.
सोन्याचे दर हे सतत वर-खाली होत असतात. त्यामुळे सकाळी पाहिलेले सोन्याचे दर संध्याकाळी सारखेच असतील असे सांगता येणार नाही.
तुम्हाला जर दागिन्यांची शुद्धता तपासायची असेल तर तुम्ही BIS CARE APP द्वारे तपासू शकता.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.