आज शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात घसरण झाली आहे. बाजारात विक्रीचा जोरदार दबाव पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 220 अंकांनी घसरला असून निफ्टी 17400 च्या खाली गडगडला आहे. आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये मोठी घसरण दिसत आहे. शेअर बाजारात आयटी सेक्टरची परिस्थिती बिकट आहे. विक्री होणाऱ्या शेअर्समध्ये आयटी शेअर्स आघाडीवर आहेत. जागतिक बाजारातील संथ व्यवहारांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसत आहे. सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांनी घसरून 59400 वर व्यवहार करत आहे. तसेच निफ्टीमध्येही घसरण झाली असून निफ्टी 17400 वर व्यवहार करत आहे. आज शेअर बाजारात आयटी आणि ऑटो सेक्टर तोट्यात असल्याचं दिसत आहे. आयटी आणि ऑटो शेअर्सवर दबाव दिसून येत आहे. आज शेअर बाजारात बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, टाटा स्टील, अल्ट्राट्रेक सिमेंट, रिलायन्स हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. तसेच एल अँड टी, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक हे शेअर्सही तेजीत आहेत. दरम्यान, एशियन पेंट्स, आयटीसी, टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, अनटीपीसी, सन फार्मा, भारतीय स्टेट बँक हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. टीसीएस, एम अँड एम, भारती एअरटेल, नेस्ले, टाटा मोटर्स, मारुती, विप्रो, पावरग्रीड या शेअर्समध्येही घसरणी झाली आहे.