मागील आठ दिवसांपासूस घसरणीसह बंद होणाऱ्या शेअर बाजारात आज तेजी दिसून आली गुंतवूकदारांकडून आज खरेदीचा जोर दिसल्याने बाजार वधारला सेन्सेक्स 448.96 अंकांच्या तेजीसह 59,411.08 अंकांवर स्थिरावला निफ्टी 146.90 अंकांच्या तेजीसह 17,450.90 अंकांवर स्थिरावला सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी 2396 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1009 कंपन्यांचे शेअर दर घसरले POWERGRID, HDFCBANK, CIPLA मध्ये घसरण डॉलरच्या तुलनेत आज रुपया मजबूत झाला. रुपया 16 पैशांनी वधारत 82.50 वर स्थिरावला SBI, AXISBANK, TECHM, TCS, HCLTECH, TATASTEEL आदीमध्ये तेजी निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 45 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली