'बिग बॉस 15' या शोचा रविवारी महाअंतिम सोहळा पार पडला असून तेजस्वी प्रकाश विजेती झाली आहे. तेजस्वीला 40 लाख रुपये आणि ट्रॉफी मिळाली आहे.

रिअॅलिटी शोमध्ये शमिता शेट्टी आणि तेजस्वीमध्ये अनेकदा वाद झालेले दिसून आले. शमिता शेट्टी याआधी 'बिग बॉस 3' मध्ये सहभागी झाली होती.

दुर्दैवाने त्यावेळी तिने चांगला खेळ खेळला नव्हता, त्यामुळे ती तिथून लगेच बाहेर पडली.

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, शिल्पा शेट्टीने तिची बहीण शमिता शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त भव्य पार्टीचे आयोजन केले आहे.

मुंबईतील बास्टियन रेस्टॉरंटमध्ये या पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. बिग बॉसच्या घरातील अनेक स्पर्धक या पार्टीला उपस्थित राहणार आहेत, मात्र तेजस्वी आणि करण कुंद्राला या पार्टीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही.

शमिता शेट्टी जिंकावी यासाठी शिल्पाने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात ती म्हणाली होती,माझी बहीण शमिता विजयाच्या खूपच जवळ आहे.

आता फक्त विजेतेपदाची ट्रॉफी जिंकायची बाकी आहे. आता यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे.

तिला विजेतेपद मिळवून देण्यात मदत करा.