'सैराट' या चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राला याड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या चर्चेमागचं कारण म्हणजे सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेले फोटो. रिंकूने निळ्या साडीतले फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. नेटकरी तिच्या या नव्या लूकवर फिदा झाले असून त्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. लूक अधिक खुलून यावा याकरिता रिंकूने गजरा माळला आहे. (all photo: RInku Rajguru/ig) (all photo: RInku Rajguru/ig)