लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात पांढऱ्या गोष्टींऐवजी काळ्या किंवा तपकिरी रंगाच्या गोष्टींचा समावेश करा



तुम्ही पांढर्‍या तांदळाऐवजी काळा तांदूळ खा, साखरेऐवजी ब्राऊन शुगर किंवा गूळ खा. याशिवाय तुम्ही ब्लॅक बेरी आणि ब्लॅक लसूण यांचाही आहारात समावेश करू शकता



या काळ्या गोष्टींमध्ये सर्व पोषक तत्व असतात तसेच मधुमेह, हृदय आणि कर्करोगाचा धोका कमी होतो



तुमच्या जेवणात ब्राऊन राईस किंवा ब्लॅक राईसचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. ते आरोग्यासाठी अनेक फायदेशीर आहे



=काळ्या तांदळात भरपूर फायबर आणि पोषक तत्व असतात. टाईप 2 मधुमेहाचा धोकाही कमी होतो. हा भात खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहते.



जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर काळ्या लसूणचा आहारात समावेश करावा



काळ्या लसणामध्ये पांढऱ्या लसणापेक्षा दुप्पट अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. काळा लसूण खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि कॅन्सरचा धोकाही कमी होतो.



काळ्या अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो. काळ्या अंजीरमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, त्यामुळे वजन झपाट्याने कमी होते.



अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की अंजीर खाल्ल्याने शरीराला कर्करोगाशी लढण्याची क्षमता मिळते.