रिंकू राजगुरू अभिनेता आकाश ठोसरसोबत डिनर डेटला गेली होती. डिनर डेटचे फोटो रिंकूनं शेअर केले होते. रिंकू आणि आकाश हे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आकाशसोबत चा फोटो शेअर करून रिंकूनं कॅप्शन दिलं, 'खूप खाल्ल यार. उद्या जरा जास्त कार्डिओ करायला लागणार.' फोटोवर 'डिनर डेट' असं स्टिकर देखील रिंकूनं टाकलं आहे. सैराट चित्रपटातील रिंकू आणि आकाशच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिंकूच्या मेकअप आणि कागर या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आकाश लवकरच झुंड या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.