प्रसिद्ध मालिकेमधील अभिनेता शैलेश लोढा हे सध्या चर्चेत आहे.



शौलेश तारक मेहता हा शो सोडला आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.



अजून शैलेश यांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण आता त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं.



शैलेश लोढा यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'हो, मजबूत असणारं लोखंड देखील तुटते. जेव्हा खोट्या गोष्टी एकत्र होतात, तेव्हा सत्य तुटते.'



अनेक नेटकऱ्यांनी शैलेश यांच्या पोस्टला कमेंट केल्या आहेत.



एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'प्रिय लोढा जी, आम्हाला ही माहिती मिळाली की तुम्ही तारक मेहता का उल्टा चष्मा शो सोडत आहात? असं का करत आहात सर? तुम्ही याबाबत पुन्हा विचार करा. '



दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं, 'सर प्लिज हा शो सोडू नका '



शैलेश लोढा यांच्या तारक मेहता का उल्टा चाष्मा या मालिकेतील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



तारक आणि जेठालालच्या मैत्रीनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.



28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता